श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पैठण (Paithan) अशा पायी दिंडी सोहळ्याचे ह भ प संजय महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 14 मार्च ते 21 मार्च 2025 दरम्यान आयोजन !
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री रोकडेश्वर हनुमान Rokadeshwar hanuman, श्री संत सद्गुरू गंगागिरीजी महाराज Gangagiriji Maharaj यांच्या कृपाशीर्वादाने व समर्थ सद्गुरु श्री संत नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने प्रसिद्ध कीर्तनकार हभप संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांच्या गार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पैठण अशा शुक्रवार दि. 14 मार्च से शुक्रवार दि. 21 मार्च 2025 दरम्यान पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती एका पत्रकात देण्यात आली आहे. दरवर्षी श्री रोकडेश्वर हनुमान महाराज पायी दिडी सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र आंबकेश्वर, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र सरला बेट, आदी ठिकाणी हभप संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते.
त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र पैठण येथेही दिडीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही शुक्रवार 14 मार्च 2025 ते शुक्रवार 21 मार्च 2025 या दरम्यान पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पैठण असा आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 14 मार्च2025 शुक्रवार
रोजी सकाळी दहा वाजता श्री रोकडेश्वर हनुमान महाराज मंदिर येथून दिडी सोहळ्याचे पूजन करून प्रस्थान होणार आहे. ही दिडी वराडे वस्ती, शिरसगाव तालुका वैजापूर, तर दुसऱ्या दिवशी मांजरी फाटा तालुका गंगापूर येथे दिडीचा मुक्काम राहणार आहे. पुरी तालुका गंगापूर, तसेच शेकटा तालुका पैठण, विसावासाठी तालुका पैठण असा हा
पायी दिंडी सोहळा जाणार असून गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 रोजी हा पायी दिंडी सोहळा पैठण येथे पोहोचणार आहे. या दिवशी 20 मार्च रोजी मुरुवारी सायंकाळी सहा ते आठ या दरन्यान हभप संजयजी महाराज जगताप भऊरकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेतही हभप संजयजी महाराज जगताप यांचा काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर या दिंडी सोहळ्यावे सहमार्गदर्शक व अन्नदाते अड प्रमोद (दादा) मुरलीधर पाटील जगताप भऊरकर यांच्यामार्फत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या दिंडीचे श्रीक्षेत्र पैठण येथे अमोल भागवत, यड़े नगर नारळा, पंचायत समिती शेजारी, पैठण येथे विसाव्याचे ठिकाण राहणार आहे.
तरी इच्छुक वारक-यांनी दिडी प्रस्थानाच्या वेळी वेळेत उपस्थित राहावे, सोबत बिछानाघ्याया मौल्यवान वस्तू आणू नये, असे आवाहन करण्यात आले असून या पायी दिंडी सोहळ्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज मंडळी, भजनी मंडळी, दिंडीचे आयोजक व सर्व वारकरी परिश्रम घेत असून इच्छुक वारक-यांनी पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे समस्त गावकरी मंडळी व भजनी मंडळी भऊर, तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. तसेच या दिडी पायी सोहळ्यासाठी वारकन्यांना चहा नाश्ता जेवण आदी दानशूर व्यक्तीचेही दिडी आयोजकानी धन्यवाद मानले आहेत.
0 Comments