नवस हा हिंदू धर्मात अतिशय भगवतनिष्ठेचा महत्वपुर्ण भाग मानला जातो.आपल्या आवडत्या आणि निष्ठा असलेल्या दैवताला आवडेल अस काहीतरी भक्तीस्वरुपात द्यायच अशी हिंदू धर्मात प्रथा आहे.मग यात भगवंताकडे इच्छा व्यक्त करायची आणि इच्छा पुर्ण झाली की प्रामाणिक पणे भक्ताचा नाद पुरविणाऱ्या देवाला कबूल केलेला नवस फेडायचा असा रिवाज मानला जातो. छञपति संभाजीनगर जिल्ह्याती वैजापूर तालुक्यातील मतदारसंघाच्या तत्कालिन आजी असेलेल्या भावी आमदारांसाठी आमदार महोदयांच्या चाहत्यांनी नवस बोलला .
देवाला साकड घालून बोललेला हा नवस त्याने भक्त मनोकामना पुर्ण करत भक्त -भगवंत नात्याची लाज राखली
अन आजी आमदारांना ,भावी आमदार करत पक्षाच मुख्य पद म्हणजेच प्रतोद ही केलं
नमस्कार मी प्रविण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांच मनपुर्वक स्वागत !
वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघात ऊद्धवसेना विरूद्ध शिंदेसेना हा लढा मतदात्यांनी अनुभवला.अनेक समीकरणे बदलली जस-जशी समीकरणे बदलत गेली तस-तशी धाकधूक वाढत गेली ...
कुठला नेता आता बाजी मारणार आणि कुणाचे कार्यकर्ते गुलाल ऊधळणार याकडे लक्ष वेधलेले असतानाच
विधानसभेच्या एक वर्ष अगोदरच कार्यकर्त्यांनी आपल्या आवडत्या नेत्यासाठी देव पाण्यात ठेवले तर काहीजण देशातील लौकीक असलेल्या देवाला म्हणजेच तिरूपती बालाजी ला नवस बोलून आले. देवा माझ्या आमदारांना नामदार कर असा तो नवस ! नवस पुर्ण झाला की ,नामदार आमदारांना घेऊन आम्ही तुझ्या दर्शणाला येऊ अस भक्त आणि भगवंत यांच्यातील हे गोड एग्रीमेंट सध्या चर्चेचा विषय बनलय!.
हा नवस होता वैजापूरचे कार्यसम्राट जनऊपाधी प्राप्त आमदार प्रा रमेश बोरनारे यांच्यासाठीचा ...
ठरल्याप्रमाणे नवस पुर्ण झाला अन कार्यकर्ते नवस फेडण्यासाठी थेट तिरूपती बालाजीकडे आमदारांना घेऊन निघाले.
यापुर्वी एका कार्यकर्त्याने बोरनारे यांना आमदार कर देवा मी शिर्डीला सायकलवरून येईल असा नवस बोलला आणि कार्यकर्ता थेट सायकलवरून साईबाबांकडे गेला.
नेत्याप्रती निष्ठा असेलेले कार्यकर्ते आपला नेता सत्तेत रहावा यासाठी अगदीच कागदावर नाही तर काळजावर नांव कोरण्याच्या तयारीत असतात.
याचच मुर्तीमंत ऊदाहरण म्हणजे आमदार प्रा रमेश बोरनारे हे होय.
काल ता सात फेब्रुवारी रोजी ही सर्व मंडळी आता तिरूपती बालाजी या देवस्थानला दर्शनासाठी गेले आहेत.
साधारणत: आठवडाभराचा त्यांचा हा प्रवास असणार आहे.
आमच्या नेत्याच देवा भल कर..
आणि कार्यकर्त्यांच स्वप्न पुर्ण कर
असा हार्ड विषय आमदार प्रा रमेश बोरनारे यांच्या कार्यकर्त्यांचा आहे.
आणि आमदार माझा नवसाचा
हा विषय आता यानिमीत्त चर्चेत आला आहे.

0 Comments