करंजगावच्या कर्मभुमी आश्रमात,शिवमहापुराण कथेसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

करंजगावच्या कर्मभुमी आश्रमात,शिवमहापुराण कथेसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
 

छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील करंजगांव येथे श्री राष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमित ,श्री. संत सद्‌गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज कर्मभुमी आश्रम करंजगांत स्थापनेचा २६ वा श्री कर्मेश्वर महादेव,सप्तर्शी ,श्री. संत जनार्दन स्वामी, नवग्रह, दत्तात्रय बजरंगबली मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या 25 वा वर्धापन दिना निमित श्री. संत सद्‌गुरु जनार्दन स्वामी यांच्या आशिर्वादाने हा भव्य-दीव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास,भोलेगिरीजी महाराज
सोमेश्वरगिरीजी महाराज, शिवाबाबा महाराज ,विष्णुगिरीजी महाराज,विमलगिरीजी महाराज, गुरुबंधु यांच्यासह अन्य संतांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमास शुक्रवार ता 07 मार्च पासून सुरूवात होणार आहे.तर सांगता मंगळवार ता 12 रोजी प.पू. श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष (जुना आख्वाडा) निलगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर यांच्या प्रवचनाने होणार आहे.

पाच दिवस सातत्याने सुरू असणाऱ्या या धार्मिक कार्यात भाविकांसाठी शिवमहापुराण कथा, शिवलीलामृत पारायण व महिला-पुरुष जपानुष्ठाण सह रूद्रस्वाहाकार यज्ञ, अखंड नंदादिप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमीत्त दररोज अन्नदान सोहळा विवीध भाविकांच्या सहकार्यातून पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन कर्मभूमी आश्रम करंजगांवचे मठाधिपती प.पू.बालगिरीजी महाराज यांच्या वतीने व भाविकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवमहापुराण कथा प्रवक्ते ह.भ.प.श्री. हरिदासजी महाराज कदम (भायगाव गंगा) यांच्या अमृतवाणीतून भाविकांना सायं. 7 ते 9 या वेळेत कथा श्रवण करता येणार आहे.

असे असतील दैनंदिन कार्यक्रम 

शुक्रवार ता 07 रोजी महाटे ५ ते ६-३० नित्यनियम विधी आरती, प्रवचन  ७ ते ९ शिवलीलामृत पारायण व नंतर सायं. ७ ते ९ सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व नित्यनियम विधी आरती, सायं. ६ ते ९ शिवपुराण कथा ,शनीवार ता 8 रोजी पहाटे ५ ते ६-३० नित्यनियम विधी आरती, प्रवचन

सकाळी ७ ते ९ शिवलीलामृत पारायण व जपानुष्ठाण सुरूवात नंतर सायं. ७ ते ९ सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व नित्यनियम विधी आरती, सायं. ६ ते ९ शिवपुराण कथा, रविवार ता 9 रोजी पहाटे ५ ते ६-३० नित्यनियम विधी आरती, प्रवचन, सकाळी ७ ते ९ शिवलीलामृत पारायण सकाळी ८ वा. रुद्रस्वहाकार यज्ञ पुजनास सुरूवात, श्री गणपती पुजन, पुण्याह वाचन, मातृका पुजन, आचार्य वरणी, देवतास्थान यज्ञ पुरोहित: वे.शा.सं. प्रभाकर गुरू पैठणे व सहकारी सायंकाळी ६ ते ७ नित्यनियम विधी आरती नंतर सायंकाळी ७ ते ९ सोमवार ता 10 रोजी ६ ते ७ नित्यनियम विधी आरती, प्रवचन, सकाळी ७ ते ९ शिवलीलामृत पारायण सकाळी ८ वा. रूद्रस्वहाकार यज्ञ हवन व मंगळवार ता 11 रोजी  पहाटे  रुद्राभिषेक,  नित्यनियम विधी, आरती, प्रवचन, ८ ते ११ बाबाजीॆची पालखी मिरवणूक नंतर स्थापित देवता पूजन, घट पुजन  होईल यानंतर श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष (जुना आखाडा) निलगिरी पर्वत ञ्यंबकेश्वर यांचे मधूर प्रवचन आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Post a Comment

0 Comments