वैजापूर येथील शंभर खाटाच्या रुग्णालयात सीटी स्कॅन सेवेचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार असून या कक्षाचा शुभारंभ आमदार रमेश बोरनारे फीत कापून करणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबू मोरे यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी आमदार रमेश बोरनारे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन सिटी स्कॅन यंत्र सुविधा कार्यान्वित करण्याची मंजुरी आणली होती. आरोग्य विभागाने ट्रामा केअर सेंटर इमारतीत तळमजल्यावर कृष्णा डायगोनिटक्स यांच्याशी करार पद्धतीने ही सेवा
रुग्णांसाठी मोफत राबवली जाणार आहे. दुपारी १ वाजता सी. टी स्कॅन सेवेचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याहस्ते दूरदृश्य प्रणाली (ऑनलाइन) संपन्न होणार आहे. व आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या हस्ते कक्षाची फित कापून शुभारंभ करण्यात येईल.
सर्व चाचण्या मोफत होणार :
उपजिल्हा रुग्णालयात सी टी स्कॅन कक्षात मानवी शरीरातील सर्व अवयवांच्या जटील आजाराचे निदान करण्या कामी सी.टी. स्कॅन सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी ह्या चाचणीसाठी रुग्णांना संभाजीनगर येथे जावे लागत होते, आता स्थानिक पातळीवर ही सुविधा रुग्णांना उपलब्ध होणार आहे.
0 Comments